1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (09:21 IST)

प्रवीण तोगडिया येत्या २४ जूनला नवा पक्ष स्थापन करणार

विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रवीण तोगडिया २४ जूनला नवा पक्ष स्थापन करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी  वडोदरामध्ये ते पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. 
 

मोदी सरकारला तोगडिया यांनी उणे २५ टक्के गुण देत सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली. फक्त स्वप्न दाखवून सत्ता मिळवता येत नाही. सत्तेसाठी सरकारने काम करावे लागते आणि त्याचे चांगले परिणामही दिसावे लागतात असे ते म्हणाले. मोदी सरकारने त्यांच्या आश्वासनांपासून यू टर्न घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अनेक नेते नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा, गोवंश हत्याबंदी लागू करावी आणि ३७० कलम रद्द करण्याची मागणी केली. तोगडिया यांनी १४ एप्रिलला विहिंपची साथ सोडली.