testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राजमा-उडीद डाळ

rajma
वेबदुनिया|
साहित्य : एक कप उडीद, 1/2 कप राजमा, 4 कप पाणी, 1 तुकडा कापलेला अद्रक, 4 पाकळ्या लसूण, 1 कापलेला कांदा, 3/4 चमचा गरम मसाला, 2 कापलेली हिरवी मिरची, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 मोठे चमचे तेल, 3/4 चमचा जिरे, कोथिंबीर, 2 मोठे कापलेले टोमॅटो, 3/4 चमचा तिखट.
कृती : उडीद व राजमाला चार काप पाण्यात एक चिमूट मीठ टाकून उकळावे. तेल गरम करून जिरं फोडणी द्यावी मग कांदा, लसूण, अद्रक व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, तिखट व हळद घालून एक मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकावे. तीन मिनिटानंतर उकळलेल्या डाळी घालाव्या आणि चमच्याने चांगल्याप्रकारे घोटावे. चार-पाच मिनिट उरल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला घालावा आणि तंदुरी पोळीसोबत गरम-गरम सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :