खास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)
साहित्य :- अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप राजमा, पाव कप चणाडाळ, एक टोमॅटो चिरलेला, एक कांदा चिरलेला, दोन टीस्पून लोणी, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीपुरते लाल तिखट, मीठ.
कृती :- सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल तिखट, घालून कुकरला शिजवून घ्यावी. कढईत लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्यावा. त्यात टोमॅटोची पेस्ट घालून पुन्हा परता म्हणजे त्यातील तेल वेगळे होईल. त्यात हिंग आणि गरम मसाला घालून मिनिटभर परतावेत. शिजलेल्या डाळी घालून पुन्हा थोडा मंद आचेवर ठेवावा. वाढण्यापूर्वी वरून बटर घालावे, आणि सर्व्ह करावे.