झेंडूची फुले ही आहे गुणकारी

Last Modified मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (00:07 IST)
रक्‍त मुळव्याधीवर उपयोगी – हे मूळव्याधीवर विशेषकरून रक्‍त पडणाऱ्या मूळव्याधीवर फार चांगले गुणकारी आहे. ह्याचा पोटात घेण्यास व वरून बांधण्यास असा दुहेरी उपयोग करतात. झेंडूच्या नुसत्या पाकळ्या काढून त्या वाटून त्याचा रस काढावा. तो रस अंदाजे 10 मि. ली. त्यात 30 ग्रॅम चांगले तूप घालून दिवसातून दोन वेळ सांजसकाळ घ्यावा. दोन तीन दिवसात परिणाम होतो. मूळव्याधीतून रक्‍त पडण्याचे थांबते. मूळव्याधीची जागा सुजून ठणका लागला तेव्हा झेंडूची फुले चांगली नीट वाटून त्यात तूप, हळद घालून ऊन करावे; चांगले ऊन झाल्यावर ते पोटीस मूळव्याधीवर बांधावे. ठणका थांबतो व मूळव्याध बरी होते.
जखमेवर – झेंडूची फुले वाटून त्यात तूप, हळद घालून कोमट करावे. सहन होईल इतपत कोमट झाल्यावर ते पोटीस जखमेवर बांधावे. जखमेचा ठणका लगेच थांबतो. दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू सणांमध्ये अग्रगण्य स्थान आहे.

दात ठणकत असेल तर – झेंडूची पाने व फुले एकत्र वाटून त्याची गोळी दाताखाली धरावी.

सूज आणि मुका मारावर – सूज आली असता तसेच मुक्‍कामारावर झेंडूची पाने स्वच्छ धुवून वाटून त्याचे पोटीस बांधावे. लेप किंचित गरम करून लावावा. सूज उतरण्यास मदत होते. अशाप्रकारे झेंडूचे अनेक औषधी उपयोग आहेत.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा
दुधात साखर मिसळून चांगले उकळून घ्या. थंड करून त्यात वेलची पावडर, इसेन्स आणि क्रीम मिसळा. ...

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला
यकृत म्हणजे लिव्हर हे एखाद्या स्पॉंज सारखा शरीराचा नाजूक अंग असून यात बिघाड झाल्यास ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा
आपल्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी आपल्या केसांना आणि त्वचेला सुंदर आणि निरोगी ...

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार
आजकालच्या धावापळीच्या जीवनशैलीत लोकं आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकत नाही, त्यामुळे ...

Try this : पोटफुगीवर इलाज

Try this : पोटफुगीवर इलाज
सकाळची सुरुवात प्रसन्नतेने व्हावी, अशी सार्‍यांचीच इच्छा असते. परंतु बर्‍याचदा सकाळीच पोट ...