भाजप नेते तंबू सोडून हॉटेलकडे
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनातील तंबू असणार्या गैरव्यवस्थेमुळे नेतेमंडळी नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी तंबू सोडून हॉटेलची वाट धरली आहे. तंबू सोडणार्यांमध्ये भाजपचे पहिल्या फळीतील अनेक नेते आहेत. प्रामुख्याने त्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा, राज्यसभेतील नेते अरूण जेटली, माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, युवा नेता वरूण आणि मनेका गांधी यांचा समावेश आहे.
भाजपने राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रथमच हॉटेल ऐवजी तंबूची व्यवस्था सर्वांसाठी केली. परंतु तंबूंमध्ये अनेक असुविधा आहेत. एका तंबूत दोन पदाधिकारी राहण्याचे निश्चित झाले असताना पाच, पाच जणांना मिळून एक तंबू दिला गेला आहे. त्यात प्रसाधनबाबतीत अडचणी आहेत. सकाळी वरुन गांधीही ही व्यवस्था पहिल्यानंतर आई मनेकासोबत हॉटेल गाठले. त्यानंतर सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनीही हॉटेलचा रस्ता धरला.
पत्रकार परिषदेत भाजपने नेतेमंडळी हॉटेलमध्ये गेल्याचे अमान्य केले. राजनाथसिंह यांची प्रकृती बरी नसल्याने ते हॉटेलमध्ये गेल्याचे भाजप प्रवक्ते प्रकाश जावळेकर यांनी सांगितले.