1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की....

अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की....

anushaka
स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि स्टार अभिनेत्री अनुष्का शमार्ल या जोडीत काही दिवसांपासून काहीतरी बिघडल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तळात सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या रिलेशनशीपबद्दल कधीही जाहीरपणे न बोलणार्‍या अनुष्कानं आपल्या नात्याला खूप सीरिअसली घेतलयं. ती विराटसोबत लवकरच विवाहबंधनात अडकण्याची स्वप्न पाहतेय. पण, विराट... त्याला मात्र आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं.... त्यामुळे तो थोडा चिल् आहे... आणि त्यामुळेच त्यानं आपल्या विवाहाचा विचारही पुढे ढकललाय. यामुळेच अनुष्का त्याच्यावर चिडलीय. याचमुळे, विराटसोबत हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या लग्नातही न जाण्याचा निर्णय तिनं घेतलाय. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या नात्याला खूप गंभीरतेनं घेणार्‍या अनुष्कानं काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये असताना लव्ह लॉक ब्रिजवर विराट आणि आपलं नावही लिहिलं होतं.