1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. अन्नू कपूर नॅशनल चॅनलवर

अन्नू कपूर नॅशनल चॅनलवर

अभिनेता, सूत्रसंचालक, निवेदक अशा भूमिकेत वावरणारे अन्नू कपूर दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर फोर्टी प्लस हा नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही वर्षांपूर्वी कपूर यांनी दूरदर्शनसाठी कबीर व परमवीर चक्र या मालिका केल्या होत्या. अन्नू कपूर यांचा हा नवा कार्यक्रम 31 ऑगस्टपासून दूरदर्शच्या राष्ट्रीय वाहिनीवर सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 8 ते 8.30 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.