1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (14:46 IST)

अभिनेता सईद जाफ़री यांचे निधन

said jafri
चित्रपट आणि थिएटरचे प्रसिद्ध अभिनेता सईद जाफ़री यांचे रविवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांची पुतणी शाहीन अग्रवालने आपल्या फेसबुक पानावर ही माहिती दिली.  
 
यानंतर प्रधानमंत्री कार्यालयामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे, ज्यात पंतप्रधान यांनी म्हटले आहे की, ''सईद जाफ़री बहुमुखी अभिनेते होते. त्यांच्या स्वभावाला नेहमीच लक्षात ठेवला जाईल. त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली."
 
सईद जाफरी यांचा परिवारात बायको आणि तीन मुली आहे. ते मागील काही वर्षांपासून लंडनमध्येच राहत होते आणि चित्रपटापासून दूर होते.  
 
सईद जाफरी यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर तयार झालेले चित्रपट रिचर्ड एडिनबराचे ऑस्कर विजेता चित्रपट 'गांधी'मध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांची भूमिका साकारली होती.  
 
त्यांनी कला चित्रपटांसोबत व्यावसायिक सिनेमात देखील भरपूर नाव कमावले आहे.  
 
सत्यजित रे चे चित्रपट शतरंज के खिलाड़ीमध्ये अभिनयासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सह अभिनेत्याचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.