अमेरिकेला निघून गेली सनी
भारतातील सर्व कामांना स्थगिती देत चक्क आपल्या घरचा रस्ता अभिनेत्री सनी लिओनने पकडला असून सनी सध्या एका टीव्ही शोचे सूत्रसंचालन करीत होती. या सगळ्याला ब्रेक देऊन सनी अमेरिकेला निघून गेली आहे.
सनीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून आपण घरच्या सर्व व्यक्तींना आणि लाडक्या कुर्त्याला भेटण्यासाठी लॉस एंजेलिसला जात असल्याचे तिने लिहिले आहे. सनीने लॉस एंजेलिसला पोहोचताच आणखी एक फोटो पोस्ट केला आहे.
यात तिने घरी पोहोचल्याचा संदेश पाठवला आहे. ‘फ्रेंडशीप डे’ निमित्त आयोजित केलेल्या एका नाइट क्लबमध्ये नृत्य सादर करण्यासाठी अभिनेत्री सनी लिओन हैदराबाद येथे आली होती. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांचा अलोट जल्लोष आणि आरडाओरडीमुळे सनीने हा शो तत्काळ रद्द केला. यामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांनी नाइट क्लबच्या अधिकार्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पाश्र्वभूमीवर सनी कधी भारतात परत येते आणि चित्रपटातून आपला जलवा कसा दाखवते याकडे बॉलिवूडचे लक्ष लागून राहाणार आहे.