असिनला दिले सरप्राइज गिफ्ट
मायक्रोमॅक्सचा को-फाउंडर राहुल शर्मा लवकरच गर्लफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेत्री असिनसोबत लग्न करणार आहे. सध्या दोघांकडून अद्याप याविषयी काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये. अलीकडेच असिनने सांगितले, की मी माझी प्रोफेशनल कामे लवकर उरकतेय. जेणेकरून खासगी आयुष्याला जास्तीत जास्त वेळ देऊ शकेन. मी दोन वर्षापासून नवीन प्रोजेक्ट्स घेतले नाहीये.
लग्नाबाबत दोघेही खूप उत्साही आहेत. त्यामुळे राहुलने असिनला सरप्राइज गिफ्ट पाठवले आहे. याविषयी स्वत: असिनने माहिती दिली आहे. असिनने चार सिनेमांचे शूटिंग पूर्ण केले आहे, त्यामुळे राहुलने तिला प्रत्येक सिनेमा एक म्हणजे चार पुष्पगुच्छ पाठवले आहेत. सोशल नेटवर्किग साइट इंस्टाग्रामवर बुकेचे फोटो शेअर करून तिने सांगितले, ‘त्याच्याकडून विविध सिनेमासाठी विविध फ्लोअर सरप्राइज आहे.’
36 वर्षीय राहुल शर्मा मायक्रोमॅक्सचा सीईओ आहे आणि इतक्या कमी वयात एक यशस्वी उद्योगपती बनला आहे. त्याची कंपनी मायक्रोमॅक्सचा हेडक्वार्टर गुडगावमध्ये आहे. राहुलने नागपूर युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेतले आहे. शिवाय राहुलने सस्कॅचेवान युनिव्हर्सिटीमधून कॉमर्समध्येसुध्दा पदवी मिळवली आहे.