1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. इशाला बनायचे सेल्फी क्विन

इशाला बनायचे सेल्फी क्विन

जन्नत, राज 3, बेबीसारख्या हिट चित्रपटातून दर्शन दिलेल्या इशा गुप्ताला सेल्फी क्विन बनायची मनीषा असावी असा संशय घेण्यास पुरेशी जागा आहे. कारण मॉडेल कम अँक्ट्रेस इशा आजकाल दिवसभर सोशल मीडिया व त्यातही फोटो शेअरिंग अँप इंस्टाग्रामवर अँक्टिव्ह आहे. थोडय़ा थोडय़ा वेळाने ती आपले नवे नवे फोटो लोड करताना दिसते आहे. 
 
विशेष म्हणजे मेकअप नसतानाचेही फोटो ती बिनधास्त शेअर करते आहे आणि त्या फोटोतही ती सुंदरच दिसते आहे. इशा कोणताही विशेष प्रसंग, नवीन ड्रेस, हँगआऊट करतानाचे फोटोही शेअर करते आहे. फॅशन मासिक मॅक्झिमच्या कव्हरवर इशा नुकतीच झळकली आहे आणि तेही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.