ऑनस्क्रीन किसिंग करणार नाही
बॉलिवूडची बेबीडॉल अर्थात सनी लिऑनने आतापर्यंतच्या सर्वच सिनेमांमध्ये किसिंग सीन केले आहेत. मात्र, एका कार्यक्रमात जेव्हा सनी लिऑनला तिच्या बोल्ड सीनबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा सनी लिऑन म्हणाली, यापुढे ऑनस्क्रीन किसिंग सीन करणार नाही.
सिनेमांमध्ये किसिंग सीन करणे योग्य वाटत नसल्याचं सनी लिऑनचं म्हणणं आहे. शिवाय, तिचा किस घेण्याचा अधिकार केवळ पती डॅनियल यालाच असल्याचंही सनीने सांगितलं.
दुसर्या कुणासोबत किस करावंसं वाटत नसल्याचंही ती म्हणाली. आगामी सेक्स कॉमेडी सिनेमा ‘मस्तीजादे’ला सेन्सॉर बोर्डाने रोखून धरल्यानंतर आपली इमेज बदलण्याच्या प्रयत्नात सनी लिऑन आहे.
यापुढे सनी लिऑन कोणताही सिनेमा स्वीकारण्याआधी निर्मात्यासोबत एक करार करणार आहे की, कोणत्याही अभिनेत्यासोबत ऑनस्क्रीन किसिंग सीन करणार नाही.
