1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. पाकिस्तानी चित्रपटात करीना कपूर

पाकिस्तानी चित्रपटात करीना कपूर

बॉलीवूड अॅक्ट्रेस करीना कपूर एका पाकिस्तानी चित्रपटात दिसणार आहे. पाकिस्तानचे प्रसिद्ध फिल्म निर्देशक शोएब मंसूर यांनी काही दिवस अगोदर एका चित्रपटाचे कंसेप्ट करीना कपूरला ईमेलच्या माध्यमाने पाठवले होते. करीनाला आयडिया आवडला, पण होकार देण्याअगोदर तिला संपूर्ण स्क्रिप्ट ऐकायची आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार लवकरच दुबईमध्ये करीना आणि शोएब भेटणार आहे. तेथे करीनाला शोएब पूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवतील. असे म्हटले जात आहे की करीनाने चित्रपटात काम करण्याचे मन बनविले आहे.   
 
शक्य आहे की चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती पाकिस्तानात जाईल.