मला सलमानची भीती वाटायची: प्रीती झिंटा
दबंग सलमान खानसोबत काम करण्याआधी मला त्याची भीती वाटायची.’ असा खुलासा बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने केला आहे. ‘बजरंगी भाईजान’च स्टारची खास मैत्रीण प्रीतीने आपल्या 17 वर्षाच्या कारकीर्दीत सलमानसोबत जवळपास 5 सिनेमे केले आहेत. प्रीतीच्या मते, सलमान हा फारच लाजाळू आहे.
‘सलमान हा असा पहिला अभिनेता होता ज्याच्यासोबत काम करण्याआधी मला भीती वाटली होती. मला माहीत नाही असं का झालं मात्र, ते खरं होतं.’ असं प्रीती म्हणाली. बॉलीवूडमध्ये 17 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्या चाहत्यांसोबत प्रश्नउत्तरांच्या दरम्यान प्रीतीने ट्विट केलं, ‘जेव्हा ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सिनेमात सलमान जेव्हा माझे संवाद ऐकून लाजायचा तेव्हा त्याला तसं पाहणं फार आवडायचं. तो खरंच लाजाळू आहे.’
‘चोरी चोरी चुपके चुपके’ सिनेमातील सहअभिनेत्री राणी मुखर्जीसोबतही आपले चांगले संबंध आहेत.’ असंही प्रीतीने सांगितलं. राणी मुखर्जी आणि प्रीतीने ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘वीर झरा’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे.