मीरा कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये
बॉलीवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर विवाहबंधनात अडकला तरी तरुणींमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत-कपूरही लवकरच बॉलीवूडमधून पदार्पण करत आहे.
मीराची स्टाइल, तिचा फॅशन सेन्स याच्यामुळे मीराबाबत बॉलीवूडमध्ये बोलबाला होताच. मात्र शाहिद कपूरची भूमिका असलेल्या K vs SK चित्रपटातून मीरा पदार्पण करणार असल्याचं निश्चित झालं आहे. मीरा यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. K vs SK या चित्रपटात SK म्हणजे शाहिद कपूर असेल, मात्र K कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. K हे इनिशिअल्स असलेले आमिर खान, अक्षयकुमार, अनिल कपूर, अर्जुन कपूर असे अनेक अभिनेते आहेत. चित्रपटात अभिनेत्री कोण असणार याबाबतही अधिकृत माहिती हाती आलेली नाही, मात्र मीराची या चित्रपटातील भूमिका असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.