1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2015 (12:28 IST)

रोज नवा सिनेमा साईन करू शकते

sunney leon
बॉलिवूडमध्ये सनी लिऑनला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 2012 साली ‘जिस्म 2’मधून सनी लिऑनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर सनी लिऑन एकापाठोपाठ एक सिनेमे करत गेली. हिंदी सिनेमांसह तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्येही सनी दिसली. मात्र, हल्ली सनी लिऑनने सिनेमे साईन करण्याचं थोडं कमी केलं आहे. आतापर्यंतच्या अनुभवावरुन मी एक नक्की सांगू शकते की, तुम्हाला अनेकदा असं वाटतं की आपण घेत असलेला निर्णय योग्य आहे. मात्र, प्रत्यक्षात काय होईल हे सांगता येत नाही. असे सनी लिऑन तिच्या बॉलिवूड करिअरविषयी सांगते. माझे याआधीचे सिनेमे म्हणावे इतके चांगले झाले नाहीत. मात्र, त्यानंतर खूप काही बदललं आहे. आता मला हेही कळलं आहे की, ऑफर केला जाणारा प्रत्येक सिनेमा साईन करायला नको. मात्र, जर मी मनात विचार आणला तर रोज नवा सिनेमा साईन करु शकते, असेही सनी लिऑनने सांगितले. सनी लिऑन म्हणते, निर्माते चेक घेऊन येतात आणि डॅनियलला (सनी लिऑनचा पती) म्हणतात, सर आम्ही खाली पायर्‍यांवर चेक घेऊन उभे आहोत. त्यानंतर आम्हाला त्या निर्मात्यांना सांगावं लागतं की, सॉरी हा सिनेमा आम्हाला आवडला नाही. त्यामुळे आम्ही हा सिनेमा करू शकत नाही.