1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. शाहरुखकडून ‘बाहुबली’चं कौतुक

शाहरुखकडून ‘बाहुबली’चं कौतुक

शाहरुख खान
बॉलीवूडच बादशहा शाहरुख खानने एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या सिनेमाचं कौतुक केलं आहे. ‘बाहुबली हा मोठ्या मेहनतीने तयार करण्यात आलेला सिनेमा आहे, या चित्रपटाच्या माध्यमामधून प्रेरणा देणार्‍या प्रत्येकाचे आभार, ठरवलं तर आपण आकाशातही भरारी घेऊ शकतो,’ असं ट्विट शाहरुखने केलंय.
 
अनेक प्रादेशिक भाषांमध्येही बाहुबलीला मोठे यश लाभलं आहे, बाहुबली या चित्रपटाचा पुढील भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. बाहुबली सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रामया कृष्णन, सत्यराज, नासर अशा अनेक दिग्गजांच्या भूमिका आहेत.