सनीला शार्कसोबत सैराट पोहायचंय!
अभिनेत्री सनी लिओनच्या स्वप्नातील अपेक्षा फारच भलत्या आणि आश्चर्यचकित करणार्या आहेत. काही लोकांना अँडव्हेंचर करायचे असते. यासाठी स्काय डायव्हिंग, पॅराग्लाडिंग, स्कुबा डायव्हिंग याप्रकारचे साहस लोक करतात. पण सनीला अजब सैराट गोष्टी करायच्या आहेत.‘यार मेरा सुपरस्टार’ या टीव्ही शोमध्ये सनी लिओन बोलत होती. ती म्हणाली, ‘मला शार्क माशांसोबत पोहायचे आहे. मी हे करायचे ठरवले आहे. हे सर्व एका पिंजर्यात असेल त्यामुळे शार्क मला खाऊ शकणार नाहीत.’
याशिवाय काही दिवस मन:शांतीसाठी सनी लिओनला आश्रमात जाऊन राहायचे आहे. ती म्हणाली, ‘एक किंवा दोन आठवडय़ासाठी मी आश्रमात जाऊन राहणार आहे. जिथे मौनव्रत बाळगले जाते अशा आश्रमात मला राहायचे आहे. मला शांतता आवडते. मला स्वत:ला ओळखण्यासाठी अशा ठिकाणी जायचे आहे.’ ती टीव्ही शोमध्ये ‘वन नाईट स्टँड’च्या प्रचारासाठी आली होती. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
