1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 25 ऑगस्ट 2015 (10:55 IST)

सोनम म्हणते, दहीहंडी नको रे बाबा...

sonam kapoor
दहीहंडीचा जल्लोष सुरु होण्यास काहीच दिवस राहिले असताना अभिनेत्री सोनम कपूरने मात्र, दहीहंडीस उपस्थित राहण्याची आॅफर धुडकावून लावली आहे. दहीहंडी हा सुरक्षित खेळ नाही, यामुळेच तिने तब्बल सव्वा कोटींची आॅफर धुडकावली आहे.

एका दहीहंडी उत्सवात १० मिनीटांसाठी उपस्थित राहण्याची विनंती सोनमला करण्यात आली होती. यासाठी तिला सव्वा कोटी रुपये देण्याची तयारीही या आयोजकाने दर्शवली होती. मात्र सोनम कपूरने ही आॅफर नाकारली. या उत्सवात होणारे अपघात आणि गोविंदांची सुरक्षा याबाबत सोनमला भीती वाटत असल्याने तिने ही आॅफर धुडकावली.