‘अकिरा’साठी सोनाक्षीची लोकलवारी!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लहानाची मोठी मुंबईतच झाल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे तिचेही मुंबईच्या लोकलवर प्रेम असणे स्वाभाविक आहे. ‘अकिरा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात सध्या ती मग्न असून यासाठी तिने चक्क मुंबईच्या लोकलचा अनुभव घेतला.
कॉलेजमध्ये असताना ती लोकलमधून फिरली होती. तेव्हा भरपूर गर्दीत ती लोकलमध्ये चढली होती. फरक इतकाच आहे की आताच्यावेळी तिला गर्दीचा सामना करावा लागला नाही. ‘अकिरा’ चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी तिला हा वेगळा अनुभव घेता आला. ही गोष्ट तिने टिटरवरुन चाहत्यांना कळवली आहे.
ए. आर. मुरुगादास ‘अकिरा’ हा चित्रपट दिग्दर्शित करीत असून त्यांचा हा तिसरा हिंदी चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘गजनी’, आणि ‘हॉलिडे ए सोल्जर इज नेव्हर ऑफ डय़ुटी’ हे दोन चित्रपट बनवले होते.