‘कट्टीबट्टी’ पाहून आमिर रडला
परफेक्शनप्रेमी अभिनेता आमिर खानने नुकताच निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘कट्टी-बट्टी’ सिनेमा पाहिला. मात्र सिनेमाचा उत्तरार्ध आमिरच्या हृदयाला इतका स्पर्शून गेला की तो अक्षरश: ढसाढसा रडला. आमिर खानच्या डोळ्याला लागलेली धार आणि रडून लाल झालेले डोळे पाहून ट्विपलनी मात्र त्याची खिल्ली उडवली.
‘कट्टी-बट्टी’ सिनेमात आमिरचा भाचा इमरान खान आणि परफेक्शनसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहेत. ‘सिनेमातील शेवटची 22 मिनिटं मी अक्षरश: आमिरसाठी टिश्यूपेपरचा बॉक्स हातात धरून बसलो होतो. आमिरला अश्रू अनावर झालेले, मला मात्र आनंद झाला. ही माझ्यासाठी कौतुकाची थाप होती.’ या शब्दांत दिग्दर्शक निखिल अडवाणीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र आमिरचा अश्रूबांध एका दिवसापुरता फुटला नव्हता. सिनेमाच्या स्क्रीनिंगनंतर आमिर 10 दिवस माझ्यासोबत बसायचा आणि रोज रडायचा. हे पाहून प्रत्येकाच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र आमिर म्हणायचा, ‘आय कान्ट हेल्प इट यार!’ असं निखिल सांगतो.
‘सिनेमा पाहून मामाने आम्हाला फीडबॅक दिला. त्याने तो विशिष्ट भाग दुसर्यांदा पाहिला. तिसर्यांदा पाहिला. आणि तो सारखं सारखं रडायचा,’ अशी प्रतिक्रिया इमरानने दिली आहे.