1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:33 IST)

‘दंगल’साठी चोरली मराठी चित्रपटाची थीम?

आमिर खान
मिस्टर पर्फेक्ट आमिर खानचा बहुचर्चित सिनेमा ‘दंगल’चं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. आमिर खान हा काहीतरी वेगळा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. मात्र आमिर खानने ‘दंगल’च्या पोस्टरसाठी मराठी सिनेमा ‘ख्वाडा’ची थीम चोरली की काय? असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल. कारण काही दिवसांपूर्वीच ख्वाडा चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊ कर्‍हाडे यांनी ख्वाडाचं पोस्टर रिलीज केलं होतं. या पोस्टरशी साधर्म्य असलेलं पोस्टर आमिर खानच्या दंगल सिनेमाचं आहे. 
 
भाऊ कर्‍हाडे यांचा ‘ख्वाडा’ हा मराठी सिनेमा 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. ‘माझ्या या सिनेमाने आपल्याला चांगले दिवस येतील,’ असा विश्वास भाऊराव कर्‍हाडे यांनी कुटुंबीयांना दिला आणि ख्वाडा चित्रपटासाठी भाऊ कर्‍हाडे यांनी आपली जमीन विकली. 80 ते 95 लाखात ‘ख्वाडा’ची निर्मिती केली आहे. ‘ख्वाडा’ चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नेहमीच स्थलांतरित जीवन जगणार्‍या एका धनगर कुटुंबाची वास्तवदर्शी कथा ‘ख्वाडा’ मध्ये चित्रित करण्यात आली आहे.