‘बाहुबली’ने टाकले ‘धूम 3’ला मागे
राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘बाहुबली’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असला तरी त्याने पैसे कमाविण्याचा बाबतीतही चांगलीच बाजी मारली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जगभरात 500 कोटी रुपये कमाविले आहेत. बाहुबलीने आमिर खान याच्या ‘धूम 3’ चे जगभरातील कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढून जगभरात जास्त कमाई करणार्या चित्रपटांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
आमिर खानच्या ‘धूम-3’ ने भारतात 280 कोटींचा बिझनेस केला होता. त्याने जगभरात एकूण 542 कोटी रुपय्यांचा गल्ला जमविला होता. आता आमिरच्या ‘धूम-3’ ला बाहुबलीनेच नाही तर यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’नेही मागे टाकले आहे.
‘बजरंगी भाईजान’ची जगभरात एकूण कमाई 565 कोटी रुपये झाली आहे. ‘बाहुबली’ने गेल्या रविवारी 545 कोटींचा पल्ला गाठला आहे. पण सध्या हा चित्रपट तिसर्या स्थानावर आहे. आमिर खानचा ‘पीके’ पहिल्या, ‘सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ दुसर्या आणि त्यानंतर बाहुबलीचा क्रमांक लागतो.