1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (11:16 IST)

‘वेलकम बॅक’ची कमाई 100 कोटींच्याजवळ

वेलकम बॅक
बॉक्स ऑफिसवर उदय शेट्टी आणि मजनू भाईची जादू दिसत आहे. ‘वेलकम’चा सिक्वेल ‘वेलकम बॅक’ मध्ये अक्षय कुमारऐवजी जॉन अब्राहमला घेतल्याने चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत होते.  पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 
 
‘वेलकम बॅक’ फक्त भारतातच नाही, तर जगभरात चांगली कमाई करत आहे. सिनेमाची कमाई 100 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘वेलकम बॅक’ने भारतातच 50 कोटी नेट (69 कोटी ग्रॉस) कमाई केली आहे. शिवाय पाकिस्तानसह इतर देशांमध्येही सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. 
 
अनिस बज्मीच्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात 21.38 कोटी रुपयांची कमाई केली. या हिशेबाने अवघ्या तीन दिवसातच वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर एकूण 90 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाचा लवकरच 100 कोटी क्लबमध्ये समावेश होईल. अनिल कपूर, नाना पाटेकर आणि जॉन अब्राहमचा हा मल्टिस्टारर सिनेमा पहिल्या पार्टपेक्षा जास्त कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.