‘हेट स्टोरी 3’चा ट्रेलर रिलीज
‘हेट स्टोरी 3’ या सस्पेन्स थिल्रर सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हॉट सीन्सने भरलेला असा हा ट्रेलर आहे. ट्रेलरची सुरुवातच शरमन जोशी आणि झरीन खान यांच्या इंटिमेट सीनने होते. त्यानंतर एंट्री होते ती अभिनेता करण ग्रोव्हर याची. करण ग्रोव्हरही शरमन, झरीनसह मुख्य भूमिकेत आहे. हेट स्टोरी या सिनेमाच्या आधीच्या दोन सीरिजमध्ये सेक्स आणि बदल्याची कथा होती. याच विषयाच्या गोल फिरणारी कथा तिसर्या सीरिजमध्येही कायम ठेवली आहे. दोन उद्योगपती आणि त्यांच्या ताकदीची लढाई या सिनेमात दाखवण्यात आली आहे. करण ग्रोव्हरला बिझनेस डिलसाठी शरमनच्या पत्नीसोबत म्हणजेच झरीनसोबत एक रात्र घालवायची असते, अशी एकंदरीत एका वाक्यात सिनेमाची कथा सांगता येईल. मग याभोवती सिनेमा फिरतो. ट्रेलरच्या मध्यानंतर डेजी शाहही दिसते. शरमन आणि झरीननंतर डेजी आणि करण इंटिमेन्ट सीन्स करताना दिसतात. ट्रेलरच्या सुरुवातील केवळ सेक्स हायलाइट केला आहे. मात्र, त्यानंतर सिनेमाची कथा वेगळं वळण घेते. सिनेमाचं ट्रेलर एवढं हॉट आहे, की त्यावरुन सिनेमा कसा असेल, याचा अंदाज बांधता येतो.