1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2015 (11:00 IST)

‘हो मी नरेंद्र मोदी यांची मुलगी आहे’

मधुर भांडारकर
मधुर भांडारकरचा सिनेमा ‘कॅलेंडर गर्ल्स’मध्ये गुजराथी मॉडेल अवनी मोदी, एका पाकिस्तानी मॉडेलच्या रोलमध्ये दिसणार आहे. 
 
अवनी मोदीचं शिक्षण गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालं आहे, लहानपणापासून मला अँक्टिंगची आवड होती, शाळेत मी नाटकांमध्ये सहभाग घेत होते. अवनी मोदीचं यापूर्वी कुणीही सिनेजगतात नव्हतं, पण तरीही दोन तमिळ फिल्म आणि एका इंटरनॅशनल शॉर्ट फिल्ममध्ये अवनीने काम केलं आहे. अवनी मोदी ही गुजरातची आहे, पंतप्रधानदेखील गुजरातचे आहेत, तेव्हा अवनी मोदी हिला आडनावावरून विचारण्यात आलं की, पीएम तुझे लांबचे किंवा जवळचे नातेवाईक आहेत का? यावर अवनी मोदी म्हणाली, मला अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात येतो. 
 
चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना एकाने मला विचारलं होतं, तो विचारणारा परदेशी होता, प्रश्न हाच होता, तुम्ही मोदींच्या नातेवाईक आहात का?, त्यावर मी त्याला सांगितलं हो, मी त्यांची मुलगी आहे आणि यात खोटं काय आहे?, मोदी आडनावाचीच नाही, गुजरातचीच नाही, तर देशातील प्रत्येक मुलगी ही नरेंद्र मोदी यांची कन्याच आहे, असं अवनी मोदीने म्हटलंय.