अॅक्वेरियमने मिळवा धन, संपदा व समृद्धी
अॅक्वेरियम बघितले की मन एकदम प्रसन्न होतं. याने घराची सुंदरता नव्हेच तर फेंगशुईनुसार घरात सुख-समृद्धी येते. घरात एक लहानसे अॅक्वेरियममध्ये (फिश पॉट) सोनेऱ्या मासोळ्या पाळणे सौभाग्यकारक असते. फेंगशुईत मासोळी यश व व्यवसायाचे प्रतीक असते. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे अॅक्वेरियममध्ये आठ सोनेऱ्या आणि एक काळ्या रंगाची मासोळी असायला पाहिजे. जर एखादी सोनेरी मासोळी मरण पावते तर वाईट न मानता हे समजावे की घरात आलेल्या संकटांना तिने आपल्या सोबत नेले आहे, म्हणजे सोनेऱ्या रंगाची मासोळीचे मरणे वाईट नसते. अॅक्वेरियमला प्रवेश दाराच्या समोर नाही ठेवायला पाहिजे. उत्तर-पूर्व हे धनसंपदा आणि समृद्धी देणारे क्षेत्र असून जलतत्वाचे प्रतीक आहे. या क्षेत्रात अॅक्वेरियम ठेवणे उत्तम व शुभ असते. हे समृद्धी, संपत्ती आणि यश देण्यात मदत करते.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा