1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

बंद घड्याळ घरात ठेवणे अशुभ!

बंद घड्याळ घरात ठेवणे अशुभ
ND
फेंगशुई वास्तू शास्त्राचा एक रूप आहे. फेंगशुई बीना तुटा-फूट करून घराला वास्तू संमत बनवतो. फेंगशुईच्या काही टिप्स खाली दिलेल्या आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुख-समृद्धी मिळवू शकता -

1- घरात ज्या घड्याळ बंद असतील त्यांना घरातून बाहेर काढावे किंवा त्यांना परत सुरू करावे. बंद घड्याळ नुकसानदायक असते. त्याने नकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो.
2- फेंगशुईनुसार घराच्या पूर्वोत्तर कोणामध्ये तलाव किंवा फवारा शुभ असतो. याचा पाण्याचा प्रवाह घराच्या बाहेर नसून घराकडे असायला पाहिजे.
3- घराला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त ठेवण्यासाठी पूर्व दिशेत मातीचे एक लहान पात्रात मीठ ठेवून दर 24 तासाने त्यातील मीठ बदलावे.
4- आपल्या ऑफिसातील पूर्व दिशेत लाकडाने तयार केलेल्या एक ड्रॅगनची मूर्ती ठेवायला पाहिजे. याने ऊर्जा व उत्साह प्राप्त होईल.
5- घर किंवा ऑफिसात केरसुणीचा जेव्हा वापर नसतो तेव्हा त्याला नजरे आड ठेवायला पाहिजे.
6- जर घराचे मुख्य दार उत्तर, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेकडील असेल तर दाराच्या वर बाहेरील घोड्याची नाल लावायला पाहिजे. याने सुरक्षा व सकारात्मक ऊर्जा मिळते.
7- संपूर्ण खोलीत कालीन घातल्याने लाभदायक ऊर्जेचा प्रवाहात रुकावट येते.