1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

शौचकूपाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा

शौचकूपाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा
ND
जुन्या जमान्यात शौचकूप नेहमी मुख्य घराच्या बाहेर म्हणजे घराच्या काही अंतरावर असायचे. त्या काळातील ही चांगली परंपरा होती. कारण आपण ज्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन करतो, त्याला शौचकूप म्हणतात. शौचकूप आजार उत्पन्न करणार्‍या कीटकांनी व जीवाणूंनी नेहमी भरलेले असते. शौचकूपात नेहमी घाण पाण्याचे अवशेष शिल्लक राहत असल्याने प्रत्येक घरातील शौचकूप हे वाईट उर्जेचे उगमस्थान असते. ती मानवाच्या जीवनातील आशा-आकांक्षांवर अत्यंत विपरित प्रभाव टाकते.

आजच्या आधुनिक युगात घरातच शौचालय असते. त्यामुळे शौचालयाचे काम नाही, अशावेळी शौचालयाचे दार नेहमी बंद ठेवावे तसेच पाश्चात्य पध्दतीच्या शौचकूपावरील झाकण देखील नेहमी बंद ठेवावे. केवळ शौचालयात जाताना व येताना दरवाजा उघडावा. असे केल्याने शौचकूपातील वाईट उर्जा घरातील चांगल्या उर्जेत मिसळत नाही. शौचकूप रोगाणूरहित करण्यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा स्वच्छ करण्यासाठी फिनाइलचा वापर करावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचकूप अधिक सजवू नये. इंटिरिअर डेकोरेटरकडून ते न सजवता साध्या पध्दतीचेच ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा