अगली और पगली
|
दिग्दर्शक : सचिन कमलाकर खोट
कथा-पटकथा : अनिल पांडे
गीतकार : अमिताभ वर्मा
संगीत : अनु मलिक
कलाकार : मल्लिका शेरावत, रणवीर शौरी, टीनू आनंद, सुष्मिता मुखर्जी, मनीष आनंद, विहांग नायक, भारती आचरेकर.
'अगली और पगली' चा नायक कबीर अतिशय 'मनमौजी' तरूण आहे. इंजिनियरींगला असणारा कबीर दहा वर्षापासून तेच करतोय. पण त्याच्या जीवनात 'कुहू' येते आणि सगळे काही बदलून जाते.
कबीर तिच्या मागे लागतो. पण कुहू काही त्याला दाद देत नाही. त्याला ती हरप्रकारे त्रास देते. त्याला अर्धनग्न अवस्थे ती पळायला भाग पाडते. विना सीटची सायकल चालवायला लावते. एवढेच नाही तर महिलांचे हायहिल्सचे शूज घालून चालायलाही लावते. या दोघांमधल्या गमती जमती म्हणजे 'अगली और पगली' आहे.
पात्र परिचय
|
'कुहू' उर्फ पगली म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 'कठिण' किंवा 'अशक्य' मुलगी आहे. ती काय करेल खुद्द तिलाही सांगता यायचे नाही. तिच्या व्यकिगत जीवनात खूप अडचणी आहेत. त्यामुळे आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तिला त्या जाणवायला हव्यात हा तिचा अट्टाहास आहे. म्हणूनच ती अशा एका तरूणाच्या शोधात आहे, जो आपल्या प्रेमात पडेल, पण त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्याची तिची इच्छा आहे. पगलीच्या आत खोडकरपणाही दडला आहे. तो कधी बाहेर येईल सांगता यायचे नाही. त्यावेळी समोरच्याची पळता भुई थोडी होते. एवढे मात्र नक्की.
कबीर उर्फ अगली (रणवीर शौरी)
|
