1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

गोलमाल-3, धमाल कॉमेडी

बॅनर : श्री अष्टविनायक सिने विज़न लिमिटेड, इरोज इंटरनेशन
निर्माता : ढिलिन मेहता
संगीत : प्रीत
कलाकार : अजय देवगन, करीना कपूर, अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, मिथुन चक्रवर्त
रिलीज डेट : 5 नोव्हेंबर 2010

गोलमाल व गोलमाल रिटर्नच्या यशस्वीतेनंतर आता रोहित शेट्टींनी दिग्दर्शीत केलेला गोलमाल-3 दिवाळीत रिलीज होत आहे. आधीच्या दोन चित्रपटांच्या मानाने तिसर्‍या चित्रपटात आणखी धमाल कॉमेडी असणार असल्याचा दावा शेट्टींनी केला आहे.

तिसर्‍या पार्टमध्ये एकाच कुटुंबातील दोन गटांचे चित्रण करण्‍यात आले आहे. यातील एक गट परस्परांना सहकार्य करणे, सुख-दु:खात सहभागी होणे, सोबत जेवण करणे यावर विश्वास ठेवत वागणारा आहे. दुसरा मात्र या उलट आक्रमक आहे.

या दोन गटांची सांगड घालत रोहितने या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर गुदगुल्या केल्या आहेत. दिवाळीत रोहितचा हा चित्रपट रिलीज होत असून, रोहितने दिग्दर्शीत केलेला हा सहावा चित्रपट आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा