''जंबो''- हाथी मेरे साथी
|
'जंबो' एक हत्तीचे पिलू आहे. त्याला वडील नसल्याने दुसरे हत्ती त्याला त्रास देतात. जंबोला त्याच्या वडीलांविषयी अधिक काही माहीत नसते. राजासोबत युद्धात लढाई करण्यासाठी ते जात असल्याचे केवळ त्याला सांगण्यात आलेले असते. जंबोला त्याच्या वडीलांविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते.
एक दिवशी काही लोक जंबोचे अपहरण करतात.दरम्यान, जंबोची प्रिंस नामक एका मुलाशी मैत्री होते. जंबो त्याच्या मदतीने तेथून पळ काढण्यात यशस्वी होऊन एका गावात पोहचतो.
त्या गावात खूप सारे हत्ती असतात व तेही माणसाळले असल्याचे पाहून जंबोला आश्चर्य वाटते. जंबोला पाळीव बनवण्यासाठी साखळदंडात बांधले जाते. तो बुध्दीमान व शक्तिशाली व्हावा म्हणून त्याला प्राशिक्षिण दिले जाते. हळू हळू जंबो मोठा होत जाऊन अधिक शक्तिशाली होतो.
|
एका दिवशी काही लोक टॅक्स वसूल करण्यास येतात. ज्यादा टॅक्स वसूल केल्याने ग्रामस्थ निराश होतात. त्यावरून त्याच्यात हाणामार्या होतात. त्यात हत्तींच्या मदतीने ते विजयी होतात.
जंबोचा प्रताप पाहून राजा त्याला सैन्यात सहभागी करून घेतो. एकदा युद्ध होते तेव्हा जंबोला लढाईत पाठवले जाते. रणभूमित जंबोचा मुकाबला एका महाकाय हत्तीसोबत होतो. जंबोच्या वडीलांना मारणारा तोच हत्ती असल्याचे जंबोला समजते. जंबो प्राणाची बाजी लावून त्याच्याशी जोरदार लढत करतो व शेवटी जंबो विजेता ठरतो.
