''देव डी'' देवदासची आवृत्ती
निर्माता - रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक - अनुराग कश्यप
संगीत - अमित त्रिवेदी
कलाकार - अभय देओल, कल्कि कोएच्लिन, माही गिल, परख मदान
प्रसिद्ध कादंबरी 'देवदास' वर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. अनुराग कश्यप यांनी याच कादंबरीवर आधारीत 'देव डी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. फक्त देवदासच 'देव डी' झाला आहे एवढेच.. अनुराग यांनी आपल्या चित्रपटात आधुनिक देवदास दाखवला आहे. बंगाल ऐवजी पंजाब आणि दिल्लीच्या आसपासचे कथानक दाखविण्यात आले आहे.
देव डी हा श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा आहे. 12 वर्षांचा असताना शिक्षणासाठी त्याला लंडनमध्ये पाठविण्यात येते. मोठा झाल्यावर तो परत आपल्या गावी येतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. त्याची लहानपणीची मैत्रीण पारोचे लग्न झालेले असते. तिचा पती तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि त्यांना मुलेही झालेली आहेत. निराश झालेला देव तिला विसरण्यासाठी दारू आणि ड्रग्सच्या आहारी जातो.
दुसरीकडे लेनी आपल्या विश्वात आनंदी असते. एमएमएस स्कॅण्डलमध्ये तिचे नाव गोवले जाते आणि तिला घरातून पळून जावे लागते. चुन्नीकडे तिला आसरा मिळतो. चंदा या नव्या नावाने ती दिवसभर कॉलेजमध्ये जाते आणि रात्री वेश्या व्यवसाय करते. एक दिवस देव तिच्याकडे येतो आणि देव, पारो आणि चंदा यांच्यात नात्याला नाटकीय वळण येते.
दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'देव डी' च्या माध्यमातून आपल्या आणि परदेशी संस्कृतीमध्ये गोंधळून गेलेल्या सध्याच्या पिढीची मानसिकता अधोरेखीत केली आहे.

| |
|
|
दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'देव डी' च्या माध्यमातून आपल्या आणि परदेशी संस्कृतीमध्ये गोंधळून गेलेल्या सध्याच्या पिढीची मानसिकता अधोरेखीत केली आहे.