प्रेम करणारा ‘रोबोट’
निर्माता : कलानिधि मारन
दिग्दर्शक : एस.शंकर
संगीत : ए.आर. रहमान
कलाकार : रजनीकांत, ऐश्वर्या राय, डॅनी
तमिळमधील एंधिरन या चित्रपटाचे हिंदीतील रुपांतर म्हणजे रोबोट हा चित्रपट. या चित्रपटाची सुरुवात कथा फार रोचक आहे. या चित्रपटात शाहरुख खानला घेण्याचा निर्णय दिग्दर्शक एस शंकर यांनी घेतला होता. शाहरुखने याची तयारीही दर्शवली होती. अचानक या दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याने शाहरुखला वगळून शंकर यांनी रजनीकांतला यात घेण्याचा निर्णय घेतला.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रजनीकांतचा हात धरणारा एकही कलाकार नाही. हिंदीतील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यात ऐश्वर्या रॉयला घेण्यात आले आहे.
साधारण 150 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट एक्शन कम लव्हस्टोरी आहे. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर स्पेशल इफेक्ट वापरण्यात आले आहेत.
चेन्नईतील एका प्रयोगशाळेत डॉ वासी, ‘चिट्टी’ नावाचा एक रोबोट तयार करतात. हा रोबोट नाचू शकत असल्याने एखाद्याला तो माणूसच वाटेल. हा रोबोट गरज पडल्यास फाईटही करु शकतो. त्याची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. या रोबोट व माणसात केवळ फरक इमोशन्सचाच आहे.
त्याची ही कमतरता दूर करत डॉक्टर त्याच्यात इमोशन्स टाकतात. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होतो. तो शर्मिली नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडतो. त्याला प्रेम कविता सुचू लागतात.
चित्रपटात एक खलनायकही आहे. तो या रोबोटच्या माध्यमातून वाईट काम करण्याच्या प्रयत्नात असतो. रोबोट काय करतो, रजनीकांत व ऐश्वर्या यांच्या प्रेमाचे काय होते, हे पहाण्यासाठी हा चित्रपटच पहावा लागेल. या चित्रपटात रजनीकांत डबल रोलमध्ये दिसणार आहे.