1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

'महारथी' चा जलवा

महारथी चा जलवा
निर्माता - ढिलिन मेहता
दिग्दर्शक - शिवम नायर
कलाकार - ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, परेश रावल, बोमन ईरानी, नेहा धूपिया, तारा शर्मा

चित्रपटाच्या नावानुसारच यामध्ये ओम पुरी, नसीर, परेश रावल आणि बोमन ईरानी सारखे महारथी कलाकार आहेत. गुजराती नाटकावर आधारित हा एक थ्रिलर चित्रपट आहे.

IFM
चित्रपटामध्ये करीअर करण्यासाठी सुभाष (परेश रावल)ची अनेक वर्षांपासून धडपड सुरू आहे. दहा वर्षे प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नाही. एक रात्री आपल्या प्राणाची बाजी लावून तो मि. एडेनवाला (नसीरुद्दीन शाह)चे प्राण वाचवितो आणि त्याला सुरक्षित घरी पोहचवितो. सुभाषला मोठ्या बक्षिसाची अपेक्षा असते.

IFM
मि. एडेनवाला हे एका काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते असतात आणि सध्या ते आजारी असतात. ते सुभाषला ड्रायवरची नोकरी देतात. मि. एडेनवालाची पत्नी मल्लिका (नेहा धूपिया) सुंदर आणि तरूण आहे. मि. एडेनवालाचे तिच्यावर खुप प्रेम असते. पण, त्याच्या संपत्तीवर डोळा ठेऊनच तिने मल्लिकाने त्याच्याणी लग्न केलेले असते.

मल्लिकाचा कट सुभाषच्या लक्षात येतो आणि तोही यामध्ये सहभागी होऊन श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू लागतो. ते दोघेमिळून योजना बनवितात. एडेनवालाच्या वकीलांची (बोमन ईरानी) मदत घेऊन ते आजारी एडेनवालांसाठी केयरटेकर (तारा शर्मा)ची नियुक्ति करतात.

आपली योजना यशस्वी करण्यासाठी त्यांना अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागते. सतर्कता बाळगूनही अखेर गड़बड़ होतेच आणि याचा तपास घेण्यासाठी एसीपी गोखले (ओम पुरी) तेथे येतात.

सुभाष खोट्यावर खोटे बोलत जातो आणि अधिकच गुंतत जोतो. तो आपली सुटका कशी करून घेतो? हे चित्रपटातच पाहण्यातच मजा आहे.