हम फिर मिले ना मिले
|
दिग्दर्शक : मनिष गोयल
संगीत : संदेश शांडिल्य
कलाकार : सरवर आहूजा, रिया सेन, खुशबू
‘हम फिर मिले ना मिले’ हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारीत आहे. त्यात प्रेमात भाग्यरेषेचे किती महत्त्व आहे. यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दिल्लीमध्ये राहणार्या मेनकाचे कुटुंब परंपरेच्या बुरख्याखाली झाकलेले आहे. तिचा नुकताच साखरपुडा झाला असून ती तिच्या तेवाईकांना भेटण्यासाठी शिमला येथे जाते.
तिथे मेनकाची राहुलशी भेट होते. राहुल शिमलामध्येच राहणारा असून त्याचे कुटुंब श्रीमंत व आधुनिक विचारसरणीचे आहे. राहुल व मेनका यांच्यात काही दिवसांतच मैत्री होते व त्याचे प्रेमात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.
|
राहुल मेनकाला तिचा दिल्लीतील पत्ता मागतो, कारण तो तिच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना दोघांच्या नात्याची कल्पना देणार असतो. पण मेनका त्याच्यासोबत एक खेळ खेळते. तो म्हणजे, एका शंभर रुपयाच्या नोटेवर तिच्या घराचा पत्ता लिहून एका मंदिरातील दान पेटीत टाकून देते. राहुलला ती सांगते की, नशिबात लिहिले असेल तर आपली पुन्हा भेट होईल.
|
मेनकाच्या लग्नाआधी राहुल तिच्यापर्यंत पोहचतो का?
त्यांच्या नशिबात नेमके काय लिहिलेले असते?
या व अशा विविध प्रश्नाची उकल ‘हम फिर मिले ना मिले’ बघितल्यानंतरच होणार आहे.
