1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

''हल्ला'' : सुखशांतीचा शोध

IFMIFM
निर्माता : सुनील दोषी
दिग्दर्शक : जयदीप वर्मा
कलाकार : रजत कपूर, सुशांत सिंह, व्रजेश हिरजी, मनदीप मजूमदार, कार्तिका राणे

राज एक सबब्रोकर आहे आणि त्याची पत्नी आभा मार्केटिंग व्यवसायात असते. मुंबईतील उपनगरात ते फ्लॅट खरेदी करतात. याठिकाणी दोघांचा संसार सुखसमाधानाने सुरू होतो.थोडाशा आवाजाने झोपेतून जागे होणा-या राजला रात्रीच्यावेळी कसलेतरी आवाज ऐकू येऊ लागतात. रात्री झोप लागत नसल्याने तो चिंतीत असतो. पण, आभाला गाढ झोप लागत असते.

IFMIFM
हे आवाज कोठून येतात याची माहिती घेण्याचा तो निश्चय करतो. रात्री आवाज येऊ लागताच तो खाली जातो. त्याला लक्षात येते की, हा वॉचमनच्या शिट्टीचा आवाज आहे. राज त्याच्यावर चिडतो व त्याला अोरडतो. बिल्डिंगचे सचिव जनार्दन यांच्याकडे वॉचमन तक्रार करतो. बिल्डिंगच्या सुरक्षिततेसाठीच शिट्टी वाजविण्यात येत असल्याचे सांगून जनार्दन राजची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. पण, राज काही ऐकत नाही. याबातीत इतर लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो पण, त्याचा मूर्खपणाला कोणीच साथ देत नाही.एक साधी समस्या राजच्या बाबतीत गंभीर बनत जाते.

IFMIFM
रात्री झोप लागत नसल्याने त्याची ही समस्या वाढतच जाते. याचा परिणाम त्याच्या कामावरही होऊ लागतो.घरात मोठा आवाज होताच तो दचकू लागतो. त्यामुळे तो चिडचिडा बनतो. रात्रीच्या वेळी मोठा आवाज करणे त्याला मूर्खपणाचे लक्षण वाटते. पण, त्याच्या या मूर्खपणामुळे त्याच्या नित्यजीवनावर परिणाम होतो. एकूणच सामान्य माणसाच्या जीवनात येणा-या संकटाची ‘हल्ला’ ही कधा आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा