1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

कलियुगात आलेला ''हनुमान''

कलियुगात आलेला 'हनुमान'
निर्माता- परसेप्ट पिक्चर कंपनी
दिग्दर्शक- अनुराग कश्यप
संगीत- तपस रेलिया
रेटिंग- 2.5/5

IFMIFM
रिटर्न ऑफ हनुमान हा कोणत्याही चित्रपटाचा दुसरा भाग नाही. हनुमान हा पहिला चित्रपट आपण पाहिला नसला, तरी रिटर्न ऑफ हनुमान पाहण्यात कुठलीही अडचण येणार नाही. हनुमानची कथा पौराणिक होती. पण आता आलेला हनुमान आजच्या काळातला आहे.

या चित्रपटात सर्व देवदेवता आपण रोज बोलतो, तसे संवाद म्हणतात. त्यांच्या संवादात इंग्रजी शब्दही येतात. चित्रगुप्त पापपुण्याचा हिशेब लॅपटॉपवर ठेवतो. ब्रह्मदेव चित्रगुप्ताकडे पापपुण्याचा हिशेब मागतात तेव्हा ते आपल्या लॅपटॉपवर मेनका.कॉम नावाची वेबसाईट पहात असतात.

ब्रह्मदेवाने झापल्यानंतर ते पापपुण्याचा हिशेब त्यांच्याकडे एका आलेखाद्वारे मांडतात आणि पाप किती वाढलेय ते दाखवतात. इंद्र त्यावेळी मेनकेबरोबर प्रणयलीला करत असतो. नारद त्या लीला पाहण्याचा प्रयत्न करत असतात. राक्षसांकडेही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. दिग्दर्शकांने या सर्व देवदेवतांना आजच्या काळात आणले आहे.

चित्रपट करताना मुलांसोबतच मोठेही आनंद घेऊ शकतील याकडे लक्ष देण्यात आले आहे. म्हणूनच खलनायक मंडळी संजीव कुमार, शत्रूघ्न सिन्हा, राजकुमार, शाहरूख खान यांच्यासारखे संवाद म्हणतात. माकड रजनीकांतसारखी फायटिंग करताना दाखविले आहे. काही सेकंदांसाठी गांधीजीही येऊन जातात.

हनुमान स्वर्गामध्ये तेच तेच चेहरे पाहून वैतागलेला आहे. त्यांची इच्छा पृथ्वीवर जाण्याची असते. ब्रह्मदेव त्यांच्या मागणीवर स्वाक्षरी करतात आणि त्यांना पृथ्वीवर पाठविले जाते. ते एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतात.

IFMIFM
मारूती नावाचा हा मुलगा अतिशय हुशार आणि तेजस्वी असतो. तीन महिन्याचा असतानाच तो शाळेत जातो. त्याचे खाणेही एवढे की गाववाले हैराण होतात. शुक्र ग्रहावरून आलेल्या राक्षसांशी लढून हा मारूती मानवजातीचे रक्षण करतो.

चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत मजा येते. पण त्यानंतर तो नीरस होतो. बाल हनुमान मस्त आहे. संवाद चुरचुरीत आहेत. एनिमेशन अतिशय डोके लावून केले आहे. त्यामुळे लहानांना हा चित्रपट नक्की आवडेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा