''गो'' : अर्थहीन पळापळ
निर्माता : रामगोपाल वर्मा
दिग्दर्शक : मनीष श्रीवास्तव
कलाकार : गौतम, निशा कोठारी, केके मेनन, राजपाल यादव, गोविंद नामदेव
'गो' सारखा टुकार चित्रपट पाहिल्यानंतर रामगोपाल वर्मांची कीव आल्याशिवाय राहत नाही. रटाळ कथा, फालतू पटकथा व दिशाहीन दिग्दर्शनाचा 'गो' हा कळस आहे. या सगळ्यात भिकार काय हे ठरविण्याची स्पर्धा लागली तर कोणाला कोणता क्रम द्यायचा यावरही वाद होतील.
हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एकमेकांशी न जुळणार्या दृश्यांची गोधडी आहे. त्याला कुठलेही संदर्भ नाहीत. कुठलाही क्रम नाही. थोडक्यात कशाचा कशाला पत्ता नाही.
कथा म्हणजे काय तर, प्रियकर आणि प्रेयसी कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्याने मुंबईहून गोव्याला पळून जातात. याची कुठे लिंक लागते ना लागतो तोच उपकथानक मध्येच घुसखोरी करतं. उपकथानकात मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्र्यांचा खून करतो. अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्र्यांच्या खुनाचा पुरावा 'त्या' प्रियकराच्या हाती लागतो, मात्र त्यांना त्याची कल्पना नसते. पुरावा नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गुंडांसहित पोलिसही त्यांचा पाठलाग करतात. यामधून सुखरूप बाहेर पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे गो.
हा संपूर्ण प्रवास म्हणजे बालिश दृश्यांची मालिका आहे. मूळ कथानकाचा 'जांगडबुत्ता' सुटत नसताना दुसरे कथानक त्यात कोंबल्यावर काय चाललेय तेच कळत नाही. तार्किक संगती नसल्याने प्रेक्षकाच्या चेहर्यावर प्रश्नांचे जाळे निर्माण होऊन तो अस्वस्थ होतो. कोणत्याही मुख्यमंत्र्याकरवी खून करणे वगैरे असे प्रकार कुठे चालतात आणि असे राज्य भारतात कुठे आहे याचा शोध घ्यायची गरज आहे.
चित्रपटात कशाचा कशाला ताळमेळ नाही. नेसत्या कपड्यानिशी निघालेलं प्रेमी युगुल प्रत्येक दृश्यात नवीन कपड्यात वावरताना दिसतात.
'गो' मधून गौतम नावांच्या नवीन अभिनेत्याने पदार्पण केले आहे. त्याच्याकडे हिरोला साजेशी चेहरपट्टी तर नाहीच, शिवाय अभिनयाच्या बाबतीतही 'दगड' आहे. निशा कोठारी या बाईंचीही अभिनयाच्या नावाने बोंबच आहे. तोकडे कपडे एवढ्या एकमेव आधारावर ती वावरते. के के मेननने हा चित्रपट का केला, हे त्याचेच त्याला माहित. राजपाल यादव मनोरंजन कार्यभाग उरकतो. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून मनीष श्रीवास्तवचे नाव झळकते. या महाशयांनी जे काही केलंय त्याविषयी न लिहिलेलं बरं. कारण चित्रपट ड्रायव्हरविना चालणार्या गाडीसारखा कधीही, कुठेही धडकतो.
काही दृश्यात तर अनावश्यक काळोख आहे. तांत्रिक बाबतीतही चित्रपट रद्दाड आहे. चित्रपटावर कँटिनवाले तेवढे खुष असतील. कारण गाणी सुरू होताच, प्रेक्षक कँटिनकडे धाव घेतात.
थोडक्यात 'गो' बघताना चित्रपटगृहातून पळ काढण्याची इच्छा होते. चित्रपटाचे नाव आणि प्रेक्षकांची इच्छा एवढ्या मिळत्या जुळत्या होतात. हेच काय चित्रपटाचे यश!

|