1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
  6. चित्रपट परीक्षण : गुलाब गैंग

चित्रपट परीक्षण : गुलाब गैंग

review of gulag gang
गुलाब गैंग एक वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट आहे, जी एक्शनप्रधान असून महिला प्रधान आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करेल याची गारंटी नाही पण या सिनेमात माधुरीने साकारलेल्या पात्राचे नाव रज्जो आहे. हे चित्रपट संपत पालच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी महिलांसाठी गुलाब गैंग तयार केले होते आणि आता हे चित्रपटाच्या स्वरूपात पडद्यावर आले आहे. रज्जो महिलांसाठी एक आश्रम चालवते. या आश्रममधील प्रत्येक स्त्री स्वावलंबी आहे. आश्रममधील महिला साड्या, मसाले आणि इतर साहित्यांची निर्मिती करतात. या महिला आपल्या हक्कासाठी कुणासोबतही लढा देण्यास सज्ज असतात. गरज पडल्यास त्या हातात शस्त्रसुद्धा उचलतात. 
 
आश्रमातील सर्व महिलांना ज्युडो-कराटेचे ट्रेनिंग देण्यात आले आहे त्या दरम्यान रज्जोची भेट सुमित्रा देवी (जुही चावला) सोबत होते. सुमित्रा देवी राजकारणात सक्रिय आहे. सुमित्राला राजकारणाचे डावपेच चांगलेच ठाऊक आहेत. सत्ता पात्र करण्यासाठी ती रज्जोचा वापर करण्याचे ठरवते. 
 
रज्जोसुद्धा सुमित्रा देवीची मदत करते. मात्र सुमित्राचं सत्य रज्जोसमोर उघड झाल्यानंतर ती तिच्यासोबतचे नाते संपुष्टात आणते. नंतर रज्जो स्वतः राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेते आणि निवडणूक जिंकून दाखवते. यादरम्यान रज्जो आणि सुमित्रा देवी यांच्यात काटें की टक्कर होते. दोघींमध्ये संवादाची चांगली लढाई बघायला मिळते.
 
माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांचा अभिनय फारच उत्तम आहे. गुलाब गँगचे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी अशा दोन अभिनेत्रींवर डाव लावला, ज्यांच्या नावावर अनेक हिट सिनेमांची नोंद आहे. माधुरी आणि जुहीने आपल्या अभिनय आणि एक्स्प्रेशनने प्रेक्षकांचा पैसा वसूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. या दोन अभिनेत्रींच्या बळावरच सौमिक आपला हा सिनेमा हिट करु इच्छितात. या दोघींच्या अभिनयाला तोड नाही. त्यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे. म्हणायचे म्हणजे हे चित्रपट बघण्यासारखे आहे. असे चित्रपट कमर्शियल रूपात भले यशस्वी होत नाही पण एखाद्या महत्त्वाच्या मुद्यावर सामाजिक संदेश देण्याच्या बाबतीत भारतात या असल्याप्रकारचे चित्रपट फारक कमी बघायला मिळतात.