1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (11:23 IST)

बँग बँग : चित्रपट परीक्षण

bang bang
अँक्शन आणि रोमान्सची खिचडी
हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांची अँक्शन आणि रोमान्सनं ‘बँग बँग’ हा सिनेमा पुरेपूर भरलाय. या सिनेमात डॅनी, जावेद जाफरी आणि पवन मल्होत्रा यांनीही आपल्याला मिळालेल्या भूमिकांमधून लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा ‘नाईट अँन्ड डे’चा रिमेक असल्याचं सांगितलं जातंय. सिनेमा पाहून हृतिक ‘धूम-2’ आणि ‘कृष’ सीरिजमधून पुढे निघाल्यासारखा वाटतोय. सिनेमातील हृतिकचे स्टंट आणि अँक्शन सीन धमाकेदार आहेत.
 
सिनेमात जबरदस्त अँक्शन, सुंदर सुंदर लोकेशन्स आणि बॉलिवूडचे दोन सुंदर चेहरे.. प्रेक्षकांना आकर्षित करतात. एका बँकेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणार्‍या हरलीनचं (कॅटरिना कैफ) आयुष्य खूप बोअरिंगरीत्या सुरू आहे. आयुष्यात एक रोमांच उभा करण्यासाठी ‘ट्रू लव्ह डॉट कॉम’द्वारे विक्की नावाच्या एक ब्लाइंड डेट फिक्स केली जाते.
 
राजवीरलाच (हृतिक रोशन) ती विक्की समजते. या दोघांची गोष्ट काही पुढे सरकणार त्याआधीच राजवीरची काही लोकांसोबत झटापट आणि गोळीबार सुरू होतो. परिस्थिती काही अशी असते की हरलीनला अशा परिस्थितीत राजवीरसोबतच राहावं लागतं. राजवीरनं कोहिनूर हिरा चोरलेला आहे.. जो मिळवण्यासाठी पोलीस आणि एक गँग त्याच्या मागे लागलीय. सिनेमातील प्लस पॉईंट आहे हवाई सफर, स्टीमर वेगवेगळ्या कार यांद्वारे निर्माण केलेलं वातावरण.. सिनेमातील अँक्शन सीन चांगले झालेत.
 
कॅटरिना आणि हृतिकची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच भावलेली दिसतेय. हृतिकला खूपच कमी कपडे घालायला मिळालेत त्यामुळे त्याला बॉडी प्रदर्शनाच्या अनेक संधी मिळाल्यात. हृतिकच्या भूमिकेतली स्टाईल आणि अँटीटय़ूडही प्रेक्षकांना भावलाय.