1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
  4. मेरी कोमने कमावले 53 कोटी

मेरी कोमने कमावले 53 कोटी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’नं आतापर्यंत एकूण 53.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.4 कोटी कमावले होते.

ओपनिंग विकेंडला फिल्मनं 30.6 कोटींची कमाई केली. याशिवाय एका आठवडय़ात 46 कोटी रुपये कमावले आणि एकूण आतापर्यंत 53.5 कोटींची कमाई चित्रपटानं केलीय. 5 सप्टेंबरला ही फिल्म रिलीज झाली. चित्रपट ‘फाइंडिंग फॅनी’ आणि ‘क्रीचर थ्री’ रिलीज झाल्यानंतर मेरी कोमच्या कमाईवर काहीही परिणाम झाला नाहीय आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय.

तर गेल्या शुक्रवारी दीपिका पदुकोण आणि अजरुन कपूरचा चित्रपट ‘फाइंडिंग फॅनी’ रिलीज झालाय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 5.1 कोटींची कमाई केली. तर विकेंडमध्ये 19.9 कोटी कमावले.