'आप'चा मुंबईसाठी विशेष जाहीरनामा
आम आदमी पक्षाचे नेते मीरा संन्याल, सुंदर बालकृष्णन, मेधा पाटकर, मयांक गांधी, सतीश जैन आणि फिरोझ पालखीवाला या सहाजणांना आम आदमी पार्टीनं मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. यांनी मुंबईसाठी विशेष जाहीरनामा तयार केला आहे. मुंबईला एक उत्तम शहर बनवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मयांक गांधी यांचं म्हणणं आहे की, आम्हाला मुंबईचं शांघाय करायचे नाही. पण इथल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईला झोपडपट्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचेही गांधी यांनी सांगितले. झोपडपट्टीवासियांसाठी साडेचारशे चौरस फुटाच्या घरांची योजना आपल्याकडे तयार असल्याचा दावाही त्यांनी केला.
समलिंगी संबंधांना आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कलम 377ला विरोध करण्याची भूमिकाही 'आप'ने जाहीर केली आहे.