1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. 'आप'चे प्रशांत भूषण यांची टोपी उतरवली

'आप'चे प्रशांत भूषण यांची टोपी उतरवली

आम आदमी पक्षाचे (आप) नेता प्रशांत भूषण यांना शुक्रवारी जनतेच्या संतापाचा सामना करावा लागला.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये प्रशांत भूषण यांची  पत्रकार परिषद सुरु असताना एका तरुणाने त्यांच्या डोक्यावरील टोपी काढून टाकली. 'दादू' असे या तरुणाचे नाव असून पत्रकार परिषद सुरु असताना तो प्रशांत भूषण यांच्या मागून येऊन त्यांच्या डोक्यावरील टोपी काढून टेबलावर फेकून दिली. विशेष म्हणजे त्याने प्रशांत भूषण यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.  दादू हा हिंदूत्त्ववादी संघटनेचा देवपथचा कार्यकर्ता आहे. परंतु या संघटनेने त्याचा नकार दिला आहे.