1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 एप्रिल 2014 (16:04 IST)

नरेंद्र मोदींची भावाकडून पाठराखण

LoksabhaElection News
गाझियाबाद- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केली आहे. भगवान बुद्धानींही आपल्या पत्नीला सोडले होते, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले आहे.

प्रल्हाद मोदी काही कामा निमित्त गाझियाबाद येथील प्रताप विहार परिसरात आले होते. तिथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, 'भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा विवाह केला होता.

आपल्या विवाहानंतर ते पत्नी आणि दोन मुलांना सोडून निघून गेले. त्यावेळी त्यांना नाही विचारले, की आपले कुटुंब का सोडले म्हणून. मग मोदींना असे प्रश्न का विचारले जात आहेत.'  नरेंद्र मोदी हे जे काही आहे ते भाजपमुळेच आहे. त्यामुळे पहिले पक्ष आणि नंतर नरेंद्रभाई आहेत.