भाजप नेते अमित शहा अडचणीत
आझमगड हा दहशतवाद्यांचा अड्डा म्हणून संबोधणारे भाजप नेते अमित शहा अडचणीत सापडले आहे. शहा यांनी केल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चांगलेच वादंग माजले आहे.
समाजवादी पार्टीने निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. तर बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी अमित शहाबरोबरच सपाचे नेते अबू आझमी यांच्या उत्तर प्रदेश प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मायावतींनी तर आझमगडमधील भाजपचे उमेदवार रमाकांत यादव हेच सर्वात मोठे अतिरेकी आहेत, अशा शब्दांत सडकून टीका केली आहे.
शहा आणि मोदी हे विकासाचा मुद्दा सोडून जातीयवादी प्रचारावर उतरले आहेत, असा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला आहे. प्रक्षोभक भाषणबाजीमुळे निवडणूक आयोगाने शहा यांच्यावर याआधीच बंदी घातली होती.