'शरद पवार पंतप्रधान होणार नाहीत'
पुणे- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देशाची भावी पंतप्रधान होणार नाहीत. कारण पंतप्रधान होण्यासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' आमच्याकडे नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने यापुढे शरद पवारांचे नाव पंतप्रधानपदाच्या संदर्भात घ्यायचे नसल्याचेही इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पवार म्हणाले, पंतप्रधानपद मिळवण्यासाठी लागणारी मॅजिक फिगर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नाही. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार नाहीत. शरद पवार सध्या पुढील सहा वर्षांसाठी राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी यापुढे त्यांच्या नावाच्या संदर्भात पंतप्रधान असा उल्लेख करायचा नाही.
