सोनियांची संपत्ती नऊ कोटींची
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी रायबरेली मतदार संघातून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 9 कोटी 27 लाखांची संपत्ती असल्याचे यात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी राहुल गांधी यांना 9 लाखांचे कर्ज दिले असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. सोनिया गांधींची 2 कोटी 80 लाखांची जंगम मालमत्ता आणि 6 कोटी 47 लाखांची स्थावर मालमत्ता अशी एकूण मिळून 9 कोटी 28 लाखांची संपत्ती आहे. तसेच सोनियांकडे स्वत:ची कार नाही.
मागील लोकसभा निवडणूकीवेळी सोनियांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या आकडेवारी पेक्षा यावेळीची आकडेवारी सहा पटींनी वाढली आहे.
