संबंधित माहिती
- ठाण्यात १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हेरॉइन जप्त; तिघांना अटक
- महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात मंदिर विश्वस्तांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
- नागपूरच्या सावनेरमध्ये तीव्र उष्णतेमुळे एका मजुराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
- नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रकला कारची धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू
- कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने केली धाकट्या भावाची हत्या
नांदेडमध्ये ४३ लाखांहून अधिक किमतीची ४,७९६ घातक शस्त्रे जप्त
नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारीविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत तब्बल ४३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत ४,७९६ विविध प्रकारची घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून, ही नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रजप्ती मानली जात आहे.
या मध्ये ४७० तलवारी, २०९ खंजर, चाकू, २४ फायटर असे घटक शस्त्रांचा साठा आहे. ज्याची किंमत ४३ लाखांहून अधिक आहे.
जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांची विक्री करण्याऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होतेपोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वजिराबाद परिसरातील गुरू रामदासनगर येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलवारी, खंजीर, कुकरी आणि इतर घातक शस्त्रांचा साठा आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण शस्त्रसाठा जप्त केला
या प्रकरणात जसवंतसिंह प्रकाशसिंह सुखमणी आणि अन्य एका संशयिताविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, हा शस्त्रसाठा कोणत्या उद्देशाने जमा करण्यात आला होता आणि त्याचे इतर राज्यांशी काही संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
Edited By - Priya Dixit
