1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
  6. पेनेलोप क्रूझ प्रेग्नंट

Penelope Cruz four months pregnant? | पेनेलोप क्रूझ प्रेग्नंट

पेनेलोप क्रूझ प्रेग्नंट असल्याचं कळतंय. तिचा जोडीदार जेव्हियर बार्डेम याचं हे कर्तृत्व असल्याचं हॉलीवूडला कान लावून असणार्‍या रसिकांना माहिती असेलच. पेनेलॉप चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिची आणि होणार्‍या बाळाची प्रकृतीही चांगली असल्याचं कळतंय.

पेनेलोप आणि बार्डेम या दोघांची जोडी फार काळापासून एकत्र आहे. दोघांनी १९९२ मध्ये आलेल्या जेमॉन जेमॉन या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. १९९७ मद्ये आलेल्या लाईव्ह फ्लेस या स्पॅशिन फिल्ममध्ये दोघे होते. याशिवाय २००८ मध्ये विकी ख्रिस्तिना बार्सिलोना या नाटकातही त्यांनी काम केलं होतं. त्यासाठी पेनेलोपला पहिले बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेसचे ऑस्कर अवार्डही मिळाले होते.